श्रीकृष्ण जन्मभूमी वादप्रकरण फेरविचार याचिका स्वीकारली

0
35

ज्ञानवापी मशिदमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केल्यानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक लोकांकडून आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा सर्व्हे करण्याची मागणी होत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादप्रकरणी जिल्हा न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल करून घेतली आहे. गुरुवारी या प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. त्यात जिल्हा न्यायाधीश राजीव भारती यांच्या न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर विरुद्ध शाही ईदगाह मशीद प्रकरणाची सुनावणी कनिष्ठ न्यायालयात होईल, असे स्पष्ट केले.

मथुरा येथील जिल्हा न्यायालयात जन्मभूमीच्या १३.३७ एकर परिसर जागेची मालकी मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. आता १ जुलै रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. याचिकेत २.३७ एकर इतकी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या भाग असलेल्या १३.३७ एकर जमिनीपैकी ११ एकर परिसरात सध्या जन्मस्थान आहे, तर २.३७ एकर जमिनीवर शाही ईदगाह मशीद आहे. २.३७ एकर जमीन मुक्त करुन ती श्रीकृष्ण जन्मस्थानाच्या ताब्यात दिली जावी, अशी मागणी याचिकेतून केली आहे.