श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात पोलिसांनी 6 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 6 हजार 629 पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी विविध खुलासे केले आहेत. गुन्हा घडल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस किंवा तपास यंत्रणांकडे 90 दिवसांचा अवधी असतो; मात्र 75 दिवसांतच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. श्रद्धा वालकर ही वसईमध्ये राहणारी तरुणी होती, तिची हत्या दिल्लीत करण्यात आली. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावालानेच तिला ठार केले. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर आफताबला अटक करण्यात आली होती.