शेतीत ड्रोन वापरल्यास रोजगार निर्मिती ः गडकरी

0
23

कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्याने केवळ एका वर्षात ग्रामीण भागात सुमारे ५० लाख नोकर्‍या निर्माण होऊ शकतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपुरात एका समारंभात उपस्थित शेतकरी व इतरांना संबोधित करताना गडकरी बोलत होते.

मी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्याशी कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासंबंधित धोरण तयार करण्यावर काम करण्यासाठी चर्चा केल्याचे गडकरी म्हणाले. ड्रोनमधून कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ते ऑपरेट करण्यासाठी पायलट लागतील आणि यामुळे मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे गडकरी म्हणाले.