शेतकऱ्यांसह लाभार्थींना प्रलंबित अनुदान चतुर्थीपूर्वी मिळणार

0
7

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना तसेच शेतकऱ्यांना प्रलंबित अनुदानाचे पैसे गणेश चतुर्थीपूर्वी मिळतील. तसे आदेश आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काल वरील प्रकरणी वित्त विभाग व अन्य खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली व त्यांना कल्याणकारी योजनांचे मानधन व शेतकऱ्यांचे अनुदान त्यांना चतुर्थीपूूर्वी देण्याची सोय करावी, असा आदेश दिला. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मंजूर झालेला असून सर्व खात्यांच्या पुरवणी मागण्याही संमत झाल्या असल्याने सर्व खात्यांची कामे आता हातावेगळी होणार असल्याचे सावंत यांनी साांगितले. समाज कल्याण खाते महिला व बालविकास खाते आदींमार्फत सुरू असलेल्या योजनांची बिले आता मंजूर होतील. गणेश चतुर्थीपूर्वी सर्व योजनांचे लाभार्थी असलेल्या गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग व्य्ाक्ती तसेच शेतकऱ्यांनाही त्यांच्या अनुदानाचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट
केले.