शेतकर्‍यांना सन्मान मिळणे आवश्यक : सावईकर

0
95

कृषक महोत्सवाचे उद्घाटन

आपला भारत देश शेतकर्‍यांच्या ताकदीवर उभा आहे. प्राचीन परंपरा राखून ठेेवण्याबरोबरच नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग आत्मसात करून आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. कृषी व्यवसायाला चालना देताना शेतकर्‍याला योग्य सन्मान प्राप्त होणे आवश्यक आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर यांनी कृषक गौरव महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले. भारत स्वाभि’ान किसान पंचायत व अखिल गो’ंतक कृषक गौरव ’होत्सवाद्वारे शेतकरी बांधवात जागृती करण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. भारत स्वाभिमान किसान पंचायत व अखिल गोमंतक कृषक गौरव महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला कृषी व क्रीडामंत्री रमेश तवडकर, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी मंत्री मोहन आमशेकर, जिल्हा पंचायत सदस्य दया पागी, कृष्णा वेळीप, कृषी अधिकारी शिवराम गावकर, शांताजी गांवकर, खोला सरपंच अंजली वेळीप, कमलेश बांदेकर, सुरेश काणेकर, बाळकृष्ण देसाई, सरपंच भूषण प्रभू गांवकर व्यासपीठावर उपस्थित होते. भारत हा कृषीप्रधान देश असून ‘आदर्श गाव’ संकल्पना प्राचीन परंपरेचा मान राखून तरुण पिढीला जागृत करायचा प्रयत्न आहे. शेतकर्‍यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. तरुण पिढीने कृषी क्षेत्रात आत्मविश्‍वासाने पाऊल उचलेले पाहिजे. गेल्या तीन वर्षांत काणकोण तालुक्यातून कृषी क्षेत्राद्वारे केलेल्या उपक्रमातून शेतकर्‍यांमध्ये प्रबळ आत्मविश्‍वास निर्माण झाला असून काणकोण तालुक्यातून यंदाही विक्रमी भाजीपाला व मिरची पीक संपूर्ण गोव्यात पोहचविण्याचा शेतकरी बांधवांचा मनोदय असल्याचे क्रीडा व कृषीमंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले. कृषक व्यवसायाला नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेती व्यवसायाला चांगले दिवस येतील असे आमदार सुभाष फळदेसाई म्हणाले. माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुशांत तांडेल यांनी केले. कमलाकांत तारी यांनी प्रास्ताविक केले. काणकोण बालभवनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात देशभक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. विविध स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत.