शेतकर्‍यांचे दिल्लीतील आंदोलन मागे

0
20

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर ३७८ दिवसांनी दिल्लीच्या सीमांवरील शेतकर्‍यांचे आंदोलन संपुष्टात आले आहे. संयुक्त किसान मोर्चातील ४० हून अधिक शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले. दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनाच्या ठिकाणावरील तंबू हटवण्यास सुरवात झाली आहे. उद्या शनिवार ११ डिसेंबरपासून आंदोलनकर्ते परतणार माघारी आहेत. केंद्राने पाठवलेल्या प्रस्तावावर गुरुवारी संयुक्त किसान मोर्चाने सिंघू सीमेवर घेतलेल्या बैठकीनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.