तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्यासीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज सोमवारपासून त्यांनी चक्का जा’ आंदोलन शेतकरी करणार आहेत.
शेतकर्यांनी दिल्लीकडे येणारे सर्व महामार्ग अडवण्याचे ठरवले आहे. या चक्का जाम आंदोलनासाठी पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे रवाना झालेअसून केंद्रीय पोलीस दलाने उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
आंदोलनात फूट?
शेतकर्यांनी आज चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असतानाच उत्तर प्रदेशमध्येया आंदोलनाला झटका बसला आहे. चिल्ला सीमेवरील शेतकरी रात्री उशिरा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले. त्यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर हे देखील उपस्थित होते. त्यांच्यात झालेल्या चर्चेनेतर उत्तर प्रदेशच्या शेतकर्यांनी आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी चिल्ला सीमेवरून बाजूला हटल्याने दिल्ली-नोएडा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आंदोलनात फूट पडण्याची शक्यता आहे.