शेतकरी-केंद्र सरकारमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरूच

0
11

>> चौथ्या फेरीनंतरही आधारभूत किमतीवर आंदोलक ठाम

आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात काल रविवारी चर्चेची चौथी फेरी झाली. यापूर्वी 3 बैठका (8, 12 आणि 15 फेब्रुवारी) अनिर्णायक होत्या. या बैठकीत निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये पहिली चर्चा बैठकीला सुरुवात झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये पहिली चर्चा किमान आधारभूत किमतीवर खरेदीच्या हमी कायद्याबाबत झाली. केंद्राने शेतकऱ्यांसाठी कालबद्ध समितीचा प्रस्ताव दिला आहे. या बैठकीच्या आधी शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीसाठी मोदी सरकारने अध्यादेश जारी करावा, अशी मोठी मागणी केली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे शेतकरी शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमत तसेच इतर काही मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांना घेरले आहे.
शेतकरी आंदोलनाचा काल रविवारी सहावा दिवस होता. दिल्ली मोर्चासाठी निघालेले शेतकरी पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर अडकले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत एका शेतकरी व उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
हरियाणातील भारतीय किसान युनियनने कुरुक्षेत्रात किसान-खाप पंचायत बोलावली आहे. येथून हरियाणात आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली जाईल. 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद राहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा यांचा समावेश आहे.

शेतकरी मागण्यांवर ठाम

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी अद्याप मागे हटलेले नाहीत. किमान आधारभूत किमतीच्या प्रमुख मागणीवर ते ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी मोदी सरकारने सर्व सीमा अडवल्या आहेत. सरकारने रस्त्यांवर बॅरिकेड्स टाकले आहेत. रस्त्यावर लोखंडी खिळे अंथरले आहेत. आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा केला जात आहे.