शेतकरी आंदोलनाशी निगडित ‘एक्स’ अकाऊंट बंद करा

0
1

केंद्र सरकारने आदेश दिल्याचा ‘एक्स’चा निवेदनातून खुलासा; ‘त्या’ पोस्टही हटवल्या

पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असताना या आंदोलनाची माहिती सोशल मीडियावरून देण्यासाठी जे हँडल ‘एक्स’वर तयार करण्यात आले होते, ते हँडल्स हटविण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत, असा आरोप एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटने काल केला. शासकीय आदेश असल्यामुळे ‘एक्स’ने शेतकरी आंदोलनाशी निगडित हँडल आणि पोस्ट नाईलाजाने हटविल्या आहेत, असाही खुलासा ‘एक्स’ने केला आहे. मात्र ‘एक्स’ने शेतकऱ्यांशी निगडित पोस्ट आणि हँडल्स हटविण्याबाबत केंद्राच्या आदेशाशी असहमती दर्शविली. तसेच आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, असेही सांगितले.