शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे काल निधन झाले. मागील तीन-चार दिवसांपासून पाटील यांची प्रकृती नाजूक होती. त्यांनी कुठल्याही इस्पितळात उपचारासाठी नकार दिला होता.
दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची तब्येत खालावली व काल दि. ४ रोजी सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. श्री गजानन महाराज संस्थानच्या अवाढव्य कारभाराचे नियोजन शिवशंकरभाऊंनी केले.
१९६२ पासून पाटील हे गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त बनले. तर १९६९ ते १९९० अशी वीस वर्षे ते संस्थानचे अध्यक्ष होते. गजानन शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी परिसरातील अनेकांची शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांच्या निधनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.