रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम जगभरातील आर्थिक व्यवस्थेवर परिणाम दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली असून, गुरुवारी बाजार उघडताच तो एक हजार अंकानी घसरला. निफ्टीतही मोठी घसरण नोंदवण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या सर्व एक्सचेंजवर ट्रेडिंग बंद करण्यात आले आहे. भारतीय शेअर बाजार सलग सातव्या व्यवहारी दिवशी घसरणीसह बंद झाला. केवळ कालच्या घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे १३.३२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्समध्ये १४२६.२८ अंकांची म्हणजेच २.४९ टक्क्यांची घसरण झाली. ४.२७ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्स ५४,५२९.९१ अंकावर स्थिरावला, तर निफ्टीत देखील ८१५.३० अंकांची घसरण झाली. ४.७८ टक्के घसरणीसह निफ्टी १६,२४७.९५ गुणांवर स्थिरावला.