शॅक्ससाठीच्या जागांचे लॉटरी पद्धतीने वितरण

0
30

पर्यटन खात्याकडून किनारी भागात शॅक्स उभारणीसाठी जागांचे वितरण लॉटरी पद्धतीने काल करण्यात आले. पर्यटन खात्यातर्फे उत्तर गोव्यात 259 आणि दक्षिण गोव्यात 105 शॅक्स उभारणीसाठी मान्यता दिली होती. त्यानंतर पर्यटन खात्याने शॅक्स उभारणीसाठी संबंधितांकडून अर्ज मागविले होते. राज्यातील सुमारे 364 शॅक्ससाठी दीड हजाराच्या आसपास अर्ज प्राप्त झाले होते. उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी या भागात सर्वाधिक शॅक्स आहेत. पर्यटन खात्याकडून गेल्या 3 रोजी शॅकचे वितरण करण्यात येणार होते; मात्र काही कारणास्तव शॅक वितरण 7 रोजी करण्याचे जाहीर केले होते. पर्यटन खात्याकडून पाच वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या व्यावसायिकांना 80 टक्के शॅक्स देण्यात आले. 10 टक्के शॅक नवीन व्यावसायिकांना आणि 10 टक्के शॅक्स 1 ते 4 वर्षे अनुभव असलेल्या व्यक्तींना लॉटरी पद्धतीने देण्यात आले. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात शॅक्ससंबंधी एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे.