शॅक्ससाठीचे शुल्क भरण्यासाठी शनिवारपर्यंत मुदतवाढ : खंवटे

0
4

पर्यटन खात्याने किनारी भागात शॅक्स उभारणीसाठी आकारले जाणारे शुल्क भरण्याची मुदत येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली.

शॅक्स व्यावसायिकांना शॅक शुल्क भरण्यासाठी 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. पर्यटन खात्याने ज्या शॅकमालकांना शॅक उभारणीसाठी जागा मंजूर केली आहे. त्यांना शुल्काचा भरणा केल्यानंतर प्रोव्हिजनल ना हरकत दाखला दिला जाणार आहे. या प्रोव्हिजनल ना हरकत दाखल्यानंतर शॅक उभारला जाऊ शकतो. त्यानंतर अंतिम ना हरकत दाखल्यासाठी ते अर्ज करू शकतात, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

राज्यातील किनारी भागात 364 शॅक्स उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र शॅक्स व्यावसायिकांना 353 शॅक लॉटरी पद्धतीने देण्यात आले आहेत. संबंधितांना शॅक उभारणीसाठी जागेची आखणी करून देण्यात आली आहे, असेही खंवटे यांनी सांगितले.