शुक्रवारी दोन मृत्यू

0
173

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण सुरूच आहे. चोवीस तासांत नवे १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी २ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८९९ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८१५ एवढी झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६,३७१ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ६० रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५४ हजार ६५७ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९६ टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत नवीन १,९४८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४२ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
पणजीत कोरोना रुग्णांची संख्या १०७ तर मडगावातील ९५ आहे. चिंबलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४४, पर्वरीत ४८ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ७३ रुग्ण, म्हापसा ४५ रुग्ण, वास्कोत ७३ रुग्ण, कासावली ५६ रुग्ण, कुठ्ठाळीत ४२ रुग्ण आहेत.