अखेर केरळच्या राज्यपालपदाचा शीला दीक्षित यांनी राजीनामा दिला. युपीए सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांपैकी राजीनामा देणार्या दीक्षित या आठव्या राज्यपाल ठरल्या आहेत. त्यांची मिझोराम येथे बदली होण्याची शक्यता होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना भेटल्यानंतर दुसर्याच दिवशी दीक्षित यांनी पदाचा राजीनामा दिला.