प्रतिभाशाली साहित्यिक, वक्ता, दिग्दर्शक, तथा गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू सुर्या वाघ यांच्या ‘शिवगोमंतक’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिवोली येथील समर्थ मठात 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 3 वा. होणार आहे. सृष्टी प्रकाशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी महाराज आणि त्यांची नौसेना यावर बेतलेले हे पहिले पुस्तक आहे. शिवाजी महाराजांचे प्रमुख नौसेनाधिकारी तथा समुद्रयोद्धा सरखेल दर्यासारंग मैनक भंडारी यांनी मराठ्यांसाठी समुद्रात किल्ले बांधले अशा माहिती नसलेल्या योध्याविषयी या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. या सोहळ्याला प्रमुख वक्ता म्हणून गोवा विद्यापीठातील व्याख्याते चिन्मय घैसास, प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ मठ शिवोलीचे संस्थापक नीलेश वेर्णेकर, आगशी येथील सामाजिक कार्यकर्ते झेविअर ग्रेसियस, दिवाडी येथील जर्मन डिमेलो, पणजी येथील मोहम्मद खान हे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार तथा कवी संगम भोसले सूत्रसंचालन करतील.