शिवकुमारांच्या अटकेच्या निषेधार्थ बंगळुरुत प्रचंड मोर्चा

0
138

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तथा माजी मंत्री डी. शिवकुमार यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल शहरात शिवकुमार यांच्या वोक्कलिगा समाजाच्या हजारो लोकांनी मोर्चा काढून निदर्शने केली. यामुळे आता शिवकुमार यांच्यावरील कारवाईला जातीय रंग आला आहे. कर्नाटकाच्या विविध भागांतून आलेल्या वोक्कलिगा समाजातील लोकांनी या मोर्चात सहभाग घेऊन शिवकुमार यांना पाठिंबा दर्शविला.
या समाजाच्या विविध संघटनांनी त्यासाठी हाक दिली होती. म्हैसूर येथून मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला. वोक्कलिगा व लिंगायत हे कर्नाटकमधील दोन मोठे व प्रमुख समाज आहेत. वोक्कलिगा समाजात शिवकुमार हे प्रभावी नेते आहेत.