गोवा पोलीस खात्यातील पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. उपअधीक्षक शिरवईकर हे दक्षिण गोव्यात वाहतूक विभागाचे उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर रवींद्र देसाई हे कुडचडे पोलीस स्टेशनचे निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.
गोव्यातील दोन महिला होमगार्ड अनुक्रमे मीनाक्षी अनंत कुबल आणि नयन दिपू वेलिंगकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.