शिरदोन अपघात; चालकास अटक

0
14

शिरदोन येथील पुलाजवळ झालेल्या मोटरसायकल आणि ॲक्टिव्हा दुचाकीच्या यांच्यातील अपघात प्रकरणी मोटरसायकलचालक ओंकार आरोसकर याला आगशी पोलिसांनी काल अटक केली. या अपघातात दुचाकीच्या चालक संजना सावंत (22 वर्षे) हिचा मृत्यू झाला होता. हा अपघात गेल्या 12 डिसेंबरला झाला होता. या प्रकरणी मोटरसायकलचालक ओंकार आरोसकर यांच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या अपघातात ओंकार आणि मृत संजना हिची बहीण जखमी झाली आहे. त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.