राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने प्राथमिक स्तरावरील सर्व शिक्षक पदांच्या थेट भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही अनिवार्य केली आहे. हा आदेश काल जारी करण्यात आला. मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि नियम 2012 अंतर्गत, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने विहित केलेले भरती नियम सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक शाळांना लागू आहेत. एनसीआरटीईने या हेतूने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित केली पाहिजे, असे शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.