शिंदे गटातील 16 आमदार अपात्रता प्रकरणी आज फैसला

0
15

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय बुधवार दि. 10 जानेवारी रोजी जाहीर केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिली.
गोवा विधिकारमंचातर्फे गोवा विधिकार दिनानिमित्त पर्वरी येथील विधानसभा संकुलात मंगळवारी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राहुल नार्वेकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेच्या विषयावर प्रश्न विचारला असता, त्यांनी बुधवारी निर्णय जाहीर केला जाईल इतकेच मोघम उत्तर दिले.