शालेय पुस्तकात गोध्रा प्रकरणी हिंदूंना गुन्हेगार ठरवणारा उल्लेख

0
3

राजस्थान सरकारने पुस्तक घेतले मागे; भाजपचे तत्कालीन गेहलोत सरकारवर टीकास्त्र

राजस्थान सरकारने त्यांच्या राज्यातील शाळांमध्ये शिकवली जाणारी पाठ्यपुस्तके मागे घेतली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये गोध्रा प्रकरणाचा उल्लेख आहे. तसेच या प्रकरणात हिंदू आरोपी होते असा उल्लेख पाठ्यपुस्तकात आहे. असा उल्लेख असणारी सगळी पुस्तके राज्य सरकारने मागे घेतली आहेत. तसेच हे पुस्तक शाळांनी खरेदी करू नये, असे निर्देशही दिले आहेत.

राजस्थानमध्ये भाजपच्या आधी असलेल्या गहलोत सरकारने म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या सरकारने ‘अदृश्य लोग-उम्मीद और साहस की कहानियाँ या नावाचे पुस्तक राजस्थानच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते.

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांचे म्हणणे आहे की, या पुस्तकात गोध्राकांडाबाबत खोटी माहिती देण्यात आली आहे. तसेच दोन समाजांमध्ये फूट कशी पडेल याची हेतुपुरस्सर काळजी घेण्यात आली आहे. या पुस्तकात गोध्रा ट्रेन ज्यांनी पेटवली त्यांची बाजू योग्य होती असाही उल्लेख आहे. तसेच हिंदूंची बाजू ही गुन्हेगारांप्रमाणे मांडण्यात आली आहे.