‘शारदा’ घोटाळ्याचा दहशतवादी कारवायांशी संबंध नाही

0
90

लोकसभेत मंत्र्यांकडून उत्तर
शारदा चीट फंड घोटाळाप्रकरणाचा बांगला देशमधील दहशतवादी कारवायांशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. या प्रकरणाचा तसा संबंध असल्याचा आरोप भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या प्रकरणी चालू असलेल्या तपासकामा दरम्यान अजूनपर्यंत दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे आढळून आलेले नाही असे लेखी उत्तर लोकसभेत विचारलेल्या प्रश्‍नावर केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिले आहे. गेल्या रविवारी अमित शाह यांनी कोलकात्यातील एका सभेत शारदा चीट फंड घोटाळ्याचा बांगलादेशमधील जमातुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशी असल्याचा आरोप केला होता. वरील घोटाळ्यातील पैशाचा वापर बुरदवान बॉम्बस्फोटासाठी करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने तपास करण्यास एनआयएला सहकार्य केले जात नसल्याचा दावाही शहा यांनी केला होता.