शांघाय सहकार्य संघटनेची आजपासून बैठक

0
7

>> गोव्यात येणार 8 देशांचे परराष्ट्रमंत्री

>> भारत-पाक मंत्र्यांच्या चर्चेकडे लक्ष

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्रमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक गुरुवार 4 आणि शुक्रवार 5 मे 2023 रोजी दक्षिण गोव्यातील तारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे काल गोव्यात आगमन झाले.
एससीओच्या या महत्त्वाच्या बैठकीसाठी 8 राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री गोव्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एससीओ गटाचे अध्यक्षपद स्वीकारणारा भारत यंदा यजमान आहे. एससीओमध्ये रशिया, भारत, चीन, पाकिस्तान आणि चार मध्य आशियाई देश – कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे सदस्य आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी, चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग आणि रशियन परराष्ट्रमंत्री सेर्गेई लॅवरोव्ह उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचे आज गुरूवारी आगमन होण्याची शक्यता आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने परराष्ट्रमंत्री किन गँग भारत दौऱ्यावर येत असल्याची अधिकृत माहिती जारी केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये एससीओच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक विषयावर चर्चा केली जाणार आहे.

भारत-पाक बैठकीकडे लक्ष
या वर्षी मार्चमध्ये जी 20 परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीच्या बाजूला असताना, भारताने चीन आणि रशियाच्या समकक्षांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या; तथापि, एससीओ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान द्विपक्षीय बैठक अपेक्षित आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आत्तापर्यंत द्विपक्षीय चर्चेबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रशियाचे परराष्ट्रमंत्री आज 4 मे रोजी होणाऱ्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तपशील जाहीर करताना, भारतातील रशियन दूतावासाने लिहिले आहे की, 4-5 मे रोजी, रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह भारतात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेत भाग घेतील.

विशेष म्हणजे, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दुसरा भारत दौरा एका गंभीर वळणावर आला आहे, कारण जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेच्या शिखर परिषदेसाठी नवी दिल्ली भेटीवर येणार आहे. शेवटच्या वेळी एफएम गँगने भारताला भेट दिली ती मार्च 2023 मध्ये जी 20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या अगदी दोन महिने आधी होती, जिथे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी सीमा समस्यांवर चर्चा झाली होती.

बिलावल भुत्तो यांचा सहभाग

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्‌‍या मुमताज झहरा बलोच यांनी मागील साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो-झरदारी भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्या निमंत्रणावरून एससीओ परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होत आहेत. बैठकीमधील आमचा सहभाग एससीओ चार्टर आणि प्रक्रियेसाठी पाकिस्तानची सतत वचनबद्धता आणि पाकिस्तानने आपल्या परराष्ट्र धोरणाच्या प्राधान्यक्रमांमध्ये या क्षेत्राला दिलेले महत्त्व प्रतिबिंबित करते, असे प्रवक्त्याने म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल हे जवळपास 12 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला भेट देणारे पहिले परराष्ट्रमंत्री असतील. 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताला भेट दिली होती.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या निवासस्थानी युक्रेनने थेट ड्रोन हल्ला केला आहे. रशियाने दोन्ही ड्रोन निकामी केले असून युक्रेनचा हा हल्ला अयशस्वी झाला आहे. मात्र थेट पुतिन यांच्यावर केलेल्या या हल्ल्यामुळे रशियाने संताप व्यक्त केला असून युक्रेनला जशास तस उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना दहशतवाद्यांप्रमाणे मारण्यासाठी युक्रेनने ड्रोन पाठवल्याचा आरोप करून रशियाने युक्रेनला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे.
रशियाचे ‘पॉवर हाऊस’ समजल्या जाणाऱ्या क्रेमलिनने बुधवार, 3 मे रोजी एका निवेदनाद्वारे युक्रेनने आज ड्रोनने क्रेमलिनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याचे कृत्य म्हणजे दहशतवादी हल्ला आहे. रशिया त्याला जशास तसे उत्तर देईल असे म्हटले आहे.

क्रेमलिनने पुढे रशियन सैन्याने युक्रेनने सोडलेले दोन ड्रोन पाडले आहेत. हे ड्रोन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश युक्रेनला घातक शस्त्रे पुरवत असल्याचा रशियन सरकारचा आरोप आहे. युक्रेनला आतापर्यंत अब्जावधी डॉलर्सच्या छोट्या-मोठ्या शस्त्रास्त्रांची रसद मिळाली आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक ड्रोनचा ताफाही असल्याचे म्हटले आहे.