भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा केल्यानंतर चीनने या भेटीवर आक्षेप घेतला आहे. अमित शहा यांनी या भागाला भेट देणे हे आमच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे, असा दावा चीनने केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही भागांवर आपला दावा करत त्यांची नावे बदलली होती. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग वेंबिन म्हणाले, अमित शहा यांच्या अरुणाचल आणि आसामच्या दौऱ्यात चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे. हे सीमावर्ती भागातील शांततेसाठी चांगले नाही.