शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

0
13

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करुन धमकी देण्यात आली. ‘सिल्वर ओक’मधील टेलिफोन ऑपरेटरने या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली असून, पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे अजित पवारांनी सांगितले. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचे काम पोलीस करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.