देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी कोरोनाबाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. काल रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या शनिवारच्या अहवालात, भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच चोवीस तासांत ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे २३३७ सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे.