शंकर, शार्दुल भारत ‘अ’ संघात

0
99

तिरुअनंतपुरम येथे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणार्‍या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात विजय शंकर, शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी संघाचे कर्णधारपद मनीष पांडेकडे असेल. उर्वरित दोन लढतीत श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल. पहिल्या तीन सामन्यांसाठी निवडलेल्या कृणाल पंड्या, खलील अहमद, दीपक चहर व मनीष पांडे यांचा शेवटच्या दोन सामन्यांत समावेश नाही. पहिल्या तीन सामन्यांत ईशान किशन यष्टिरक्षण करणार असून उर्वरित दोनमध्ये संजू सॅमसनकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भारत ‘अ’ पहिले तीन सामने ः मनीष पांडे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, ईशान किशन, विजय शंकर, शिवम दुबे, कृषाल पंड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, खलील अहमद व नितीश राणा. भारत ‘अ’ शेवटचे दोन सामने ः श्रेयस अय्यर, शुभमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, संजू सॅमसन, नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे व ईशान पोरेल.