व्हॉट्‌सऍपवर मिळणार कोविड लस प्रमाणपत्र

0
84

सध्याच्या कोरोना काळात कुठेही जायचे असेल, तर कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले असणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र आता व्हॉट्सऍपद्वारे काही सेकंदात नागरिकांना प्राप्त होणार आहे.

९०१३१५१५१५ या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवल्यानंतर तात्काळ हे प्रमाणपत्र मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्हॉट्‌सऍपच्या मदतीने ही नवी सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत, हे लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी दोन पर्याय होते. पहिले म्हणजे कोविन पोर्टल आणि दुसरे म्हणजे आरोग्य सेतू ऍप. मात्र, आता भारत सरकारने या संदर्भात व्हॉट्‌सऍपबरोबर भागीदारी केली आहे.