व्हॅन-ट्रकची धडक; 13 जणांचा मृत्यू

0
5

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात व्हॅन आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दोन मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. व्हॅनमध्ये 17 जण होते. पहाटे 3.45 वाजता हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर व्हॅन आदळली. व्हॅनमधील सर्व लोक चिंचोली मायाम्मा देवस्थानहून शिवमोग्गा येथे परतत होते.