व्हर्टिकल लिफ्टअप पुलावर रेल्वेची चाचणी

0
3

तामिळनाडूतील रामेश्वरम येथे बांधण्यात आलेल्या नवीन पंबन रेल्वे पुलावर शुक्रवारी रामेश्वरम एक्सप्रेस रेल्वे ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हा देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्टअप पूल आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या गस्तीनौकेसाठी प्रथमच व्हर्टिकल लिफ्टअप पूल उभारण्यात आला. त्यानंतर बोट पुलाखालून गेली. पंबन पूल हे अभियांत्रिकीचे अप्रतिम उदाहरण आहे. बंगालच्या उपसागरावर बांधलेला हा पूल 2 किलोमीटर लांबीचा आहे. तो सध्याच्या पंबन पुलाला समांतर बांधण्यात आला आहे. ह्या पुलावर 531 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा पूल रामेश्वरमला तामिळनाडूच्या मुख्य भूमीशी जोडतो.