महागाईचा सामना करत असलेल्या जनेतवरील दरवाढीचा बोझा आणखी वाढणार आहे. काल मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०४ रुपयांची दरवाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर या सिलिंडरची नवीन किंमत आता २ हजार ३५५.५० रुपये झाली आहे. मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात २५० रुपये वाढ करण्यात आली होती.
१९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर दिल्लीत आता २ हजार ३५५.५० रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत २ हजार २५३ रुपये होती. महिनाभरापूर्वी १ एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यापूर्वी १ मार्च रोजी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०५ रुपयांनी, तर २२ मार्चला ९ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.