व्याघ्र क्षेत्र जाहीर केल्या न प्रकरणी राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका

0
27

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत राज्य सरकारला जो आदेश दिला होता, त्या आदेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी न केल्या प्रकरणी गोवा फाऊंडेशनने न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबरला होणार आहे.

म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, असा आदेश गोवा खंडपीठाने 24 जुलै 2023 रोजी दिला होता. खंडपीठाने दिलेली तीन महिन्यांची मुदत संपली तरी अजून सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर केले नसल्याचे गोवा फाऊंडेशनने काल गोवा खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्यास दिलेली मुदत 24 ऑक्टोबरला संपल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा फाऊंडेशनने ही अवमान याचिका दाखल केली.
दरम्यान, व्याघ्र क्षेत्रासंबंधी निर्णय घेण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करणारी एक याचिका राज्य सरकारनेही गोवा खंडपीठात दाखल केलेली आहे.