बार्देशातील वेर्ला येथील श्री राष्ट्रोळी नारायण मंदिराकडील तळीत चांदणी राजावत (१०) व पियूष राजावत (५) ह्या बहीण भावाचा काल बुधवारी संध्याकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दोघे बहीण भाऊ काल सायंकाळी क्लाससाठी गेली होती. घरी येताना मंदिराच्या तळ्यातील पाण्यात त्यांना चप्पल दिसले. ते काढण्यासाठी दोघेही आत गेली. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व ती बुडाली. या घटनेची माहिती म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही भावंडांना पाण्याबाहेर काढले. व म्हापसा पोलिसांच्या हवाली केले. दोन्ही मृतदेह जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. भावंडांची आई घरकाम करते तर वडील सुरक्षा रक्षक आहेत.