‘वेदांत’ विरोधातील याचिका फेटाळली

0
2

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अनिल सालेलकर याने वेदांत कंपनीच्या डिचोली खाणीवरील खनिज वाहतुकीबाबत दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी याचिकादार अनिल सालेलकर याने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करून चुकीच्या माहितीबाबत माफीनामा सादर केला. वेदांत कंपनीने डिचोली खाणपट्ट्यावरील खनिज मालाची पिळगाव येथील पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती. सदर खनिज वाहतुकीला विरोध करण्यात आला होता. तसेच अनिल सालेलकर यांनी गोवा खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पर्यायी रस्त्याच्या प्रश्नी हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून याचिकादार आणि वेदांत कंपनी यांना योग्य मंचाशी संपर्क साधण्याची मोकळीक दिली आहे.