वेंडल रॉड्रिक्स यांच्यावर कोलवाळ येथे अंत्यसंस्कार

0
238

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर, पर्यावरणवादी पद्मश्री वेंडल रॉड्रिक्स यांच्या पार्थिवावर शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत कोलवाळ येथे काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोलवाळ येथील निवासस्थानी वेंडल यांचे बुधवारी संध्याकाळी आकस्मिक निधन झाले. वेंडल यांच्यावर अंतिम संस्कार करण्यापूर्वी कोलवाळ येथील सेंट फ्रान्सीस ऑफ आसीस चर्चमध्ये खास प्रार्थना सभा पार पडली. स्थानिक नागरिकांबरोबर राजकीय, फॅशन, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून वेंडल यांना श्रद्धांजली अर्पण केली. वेंडल यांच्या पार्थिवावर ख्रिस्ती धार्मिक पद्धतीने कोलवाळच्या दफनभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी वेंडल याचा जोडीदार जेरोम मॅरेल, वेंडल यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, थिवीचे आमदार नीळकंठ हर्ळणकर व इतरांची उपस्थिती होती.