वीज यंत्रणा बिघडल्याने मुंबई अंधारात

0
90

मुंबईला वीज पुरवठा करणार्‍या टाटा पावर कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बिघाड झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अनेक भागांना खंडित विजेचा सामना करावा लागला. दक्षिण मुंबईत परेल, महालक्ष्मी, धारावी, चेंबूर, ग्रँड रोड या भागांतील औद्योगिक आस्थापने, निवासी वसाहतींत काल वीज नव्हती. शिवाय दुरुस्तीचे काम चालू झाल्यानंतर आळीपाळीने अनेक भागांना लोडशेडींग सहन करावे लागले.