वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम वाढू शकते ः काब्राल

0
133

>> ३५० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता

वीज खात्याच्या वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम ३५० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते, अशी माहिती वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
वीज खात्याच्या आत्तापर्यंत वीज बिलांची सुमारे ३२३ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. तर, पणजी आणि कुडचडे या विभागांची वीज बिलाच्या थकबाकीची अंतिम यादी तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वीज बिलांची थकबाकीची रक्कम ३५० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.

सरकारी खाती, महामंडळे आणि महानगरपालिका आदींची वीज बिलांची थकबाकी १२५ ते १४५ कोटी रुपयांवर आहे. तसेच खासगी आस्थापने व इतरांची थकबाकी दोनशे कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वीज बिलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. थकबाकी न भरणार्‍यांची वीज जोडणी तोडण्याची सूचना करण्यात आली आहे. वीज जोडणी तोडण्यात आल्यानंतरसुद्धा गेल्या काही वर्षात वीज बिलाचा भरणा न केलेल्या लोकांकडील थकबाकीची वसुलीसाठी महसूल कायद्यानुसार कारवाई सुरू केली जाणार आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.

वीज खात्याने डिजिटल पद्धतीने शुल्क व बिलाची रक्कम स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केल्याने धनादेश, डीडीच्या माध्यमातून रक्कम स्वीकारणे बंद केले आहे. वीज खात्याच्या कार्यालयांमध्ये कार्डाच्या माध्यमातून वीज बिल व इतर शुल्कांचा भरणा करण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच बँकेच्या माध्यमातून शुल्क व बिलाची रक्कम स्वीकारली जात आहे. धनादेशाद्वारे शुल्क किंवा वीज बिलाची रक्कम स्वीकारली जात होती. तथापि, मोठ्या प्रमाणात धनादेश बाऊन्स होऊ