वीज खात्याने नव्याने जाहीर केलेली वीज दरातील वाढ त्वरित मागे घ्यावी; अन्यथा वीज खात्यावर मोर्चा नेऊन अधिकार्यांना जाब विचारला जाईल, असा इशारा गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्ष ऍड. अश्मा सय्यद यांनी काल दिला. वीज खात्याने घरगुती वापराच्या वीज दरात प्रति युनिट ५ पैसे वाढ आणि व्यावसायिक वापराच्या वीज दरात प्रति युनिट ८ पैसे वाढ करण्याचे जाहीर केले आहे. वीज खात्याने तीन महिन्यात दुसर्यांदा दरवाढ जाहीर केली आहे. या नवीन वीज दरवाढीमुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखीन झळ बसणार आहे, असेही सय्यद यांनी सांगितले.