वीज दरवाढीवर सरकारला ‘आप’ची सूचना

0
143

घरगुती वापरासाठीच्या वीज दरात ११.४८ टक्के एवढी वाढ केलेल्या गोव्याच्या वीज खात्याला व गोवा सरकारला दिल्लीतील आम आदमी सरकारकडून बरेच काही शिकता येईल, असे आम आदम पार्टीचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी काल सांगितले.

२०१५ साली दिल्लीत ‘आप’चे सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ १० दिवसांत सरकारने पंचसुत्री कृती योजना अमलात आणताना जे लोक ४०० युनीटपर्यंत वीज वापरतात त्यांना वीज बिलात ५० टक्के अनुदान दिले. ह्या अनुदानाचा नवी दिल्लीतील ८० टक्के घरांना लाभ मिळाला असे पाडगावकर म्हणाले.