वीज खांबावरून पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

0
4

काल दुपारी काणका-म्हापसा येथील श्री साईबाबा मंदिराजवळील रस्त्याच्या बाजूला असलेला जुनाट वीज खांब बदलण्याच्या कामावेळी त्या खांबावर चढलेला झारखंडमधील भालेश्वर कुमार राठोड (32) या कामगाराचा वीज खांबासहित खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काणका म्हापसा येथील श्री साई मंदिराजवळ जुनाट वीज काम बदलण्याचे काम सुरू होते. यावेळी त्या खांबावरील विद्युत तारा मोकळ्या करण्यासाठी भालेश्वर राठोड मजूर खांबावर चढला होता. त्यावेळी तो विजेचा खांब मुळातून उन्मळून खाली कोसळला. त्याचबरोबर खांबावर चढलेला राठोड हा खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला इस्पितळात नेत असतानाच वाटेत त्याचे निधन झाले.