वीजप्रश्‍नी साधनसुविधा पुरविण्यास प्राधान्य देणार

0
104

पणजी (न. प्र.)
वीज खात्यात नोकरभरती तर केली जाईलच. पण या घडीला प्राधान्य देण्यात येणार आहे ते विजेविषयीच्या साधनसुविधा विकासाला, असे काल वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.
लोकांना विनाखंडित २४ तास वीज पुरवठा करणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. गोव्यात तशी वीजनिर्मिती होत नाही. त्यामुळे परराज्यातून होणार्‍या वीज पुरवठ्यावर आम्हांला अवलंबून रहावे लागते. परराज्यातून होणारा हा वीजपुरवठा अखंडित व्हायला असेल तर त्यासाठीच्या साधन सुविधेत सुधारणा व वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. आपण गोवा पर्यटन विकास महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर महामंडळाला नफा झाल्याचे काब्राल म्हणाले.