स्वीस रिसॉर्टने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार जगातील विश्वासू देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागत आहे. सन २०१५ साली जगातील सर्वांत विश्वासू आणि जबाबदार अशा २७ देशांचे सर्व्हेक्षण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यूएई पहिल्या क्रमांकावर असून भारतापाठोपाठ चीन व नेदरलँड यांचा क्रमांक लागतो. यानंतर जपान, रशिया, हॉंगकॉंग, दक्षिण आफ्रिका, इटली, ब्राझील, मलेशिया, फ्रान्स व अमेरिकेचा अनुक्रमे क्रमांक आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान सरकार, व्यवसाय, प्रसारमाध्यमे व सामाजिक संस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे.