केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने भाजपने गेल्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी गोव्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचे जनतेला दिलेला आश्वासन आता सरकारने पूर्ण करावे अशी मागणी काल कॉंग्रेस प्रवक्ते यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपने गोव्याला ३७१ कलमाखाली विशेष दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते व ते आता पाळण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गोवा हे एक छोटे राज्य असल्याने व येथे जमीन कमी असल्याने हा विशेष दर्जा हवा असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी गोव्यात झालेल्या वीराट सभेत विशेष दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते.