विविध खात्यांत ८०० पदांना मंजुरी

0
91

आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून सरकारने प्रशासनात मोठ्या प्रमाणात पदे तयार करून नोकरभरती करण्याचे सत्र सुरू केले आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वाहतूक, पशुसंवर्धन, आरोग्य, वन आदी खात्यात मिळून सुमारे ८०० पदे तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

विधानसभा निवडणूक फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असल्याने ऑक्टोबर नंतर कोणत्याही क्षणी विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची दुसरी बैठक लवकरच गुरुवार दि. ४ रोजी घेण्याचे ठरविले आहे. या बैठकीतही आणखी काही पदे तयार करण्याची सरकारची तयारी आहे. दरम्यान, इंदिराबालरथ योजनेखाली शिक्षण खात्याने चालक व मदतनिसांची नियमित पध्दतीने भरती करण्याचा विचार चालविल्याचे कळते.