विल्सन गुदिन्होच्या जामीन अर्जावर आज निवाडा

0
109

मेरशी येथील माजी सरपंच प्रकाश नाईक यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील एक संशयित आरोपी विल्सन गुदिन्हो याच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर गोवा जिल्हा न्यायालय गुरूवारी निवाडा देणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित ताहीर याचा शोध घेण्यास पोलिसांना यश प्राप्त झाले नाही. जुने गोवा पोलिसांनी मयत प्रकाश नाईक यांच्या मृत्युप्रकरणी मंत्री मावीन गुदिन्हो यांचे बंधू विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संशयित विल्सन गुदिन्हो याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली असून निवाडा राखून ठेवण्यात आला आहे.

जुने गोवा पोलिसांनी विल्सन गुदिन्हो याच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला असून प्रकाश नाईक यांच्या मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विल्सन याला अटक करून चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद न्यायालयात केला.