कॉंग्रेसला विरोधी नेतेपद नाकारण्याचा आपला निर्णय हा पूर्णपणे नियम व संसदीय परंपरेला धरून होता, असे सभापती सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले. लोकसभा विरोधी नेतेपदाचा अर्थ लावणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याच्या दुसर्या दिवशी सभापती म्हणाल्या की, कोर्टाकडून झालेली विचारणा ही मला नव्हे सरकारला करण्यात आली आहे.