>> पंतप्रधान मोदींची खरमरीत टीका
नव्या कृषीकायद्यांना विरोध करणार्यांना केवळ दलालांचा फायदा झालेला हवा आहे. ते केवळ विरोधासाठी विरोध करीत असल्याची खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. काळ्या पैशाचे आणखी एक माध्यम बंद झाल्याने काही लोक बिथरले आहेत, असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले. आंदोलनामध्ये ट्रॅक्टर जाळून विरोधकांनी शेतकर्यांचा अपमानच केला असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. युवक कॉंग्रेसने दिल्लीत इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर जाळून सोमवारी आंदोलन केले होते. त्यावर पंतप्रधानांनी ही जळजळीत प्रतिक्रिया दिली. नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत सहा स्वच्छता योजनांचा शुभारंभ पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केला, तेव्हा ते बोलत होते.