विमानतळाला पर्रीकरांचे पूर्ण नाव देण्याची मागणी फेटाळली

0
16

विधानसभेत काल विरोधी पक्षांच्या आमदारांनी मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे पूर्ण नाव देण्याची केलेली मागणी सरकारने फेटाळून लावली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोप येथील नवीन ग्रीन फिल्ड विमानतळाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याचा ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा व इतर विरोधी आमदारांनी मनोहर पर्रीकर यांचे पूर्ण नाव देण्याची मागणी लावून धरली; मात्र सत्ताधारी गटाकडून ठरावात दुरुस्तीची मागणी फेटाळण्यात आली.