विमानतळांवरील मद्यालये 24 तास खुली

0
24

राज्य सरकारने गोवा उत्पादन शुल्क कायद्यात दुरुस्ती केली असून राज्यातील विमानतळावरील मद्यालये चोवीस तास खुली ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानतळावरील किरकोळ मद्य विक्री सुलभ करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. विमानतळावरील मद्याची किरकोळ विक्रीसाठी परवाना असलेली दुकाने 24 तास खुली ठेवली जाऊ शकतात, असे वित्त खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे. विमानतळावरील मद्यविक्री दुकान, मद्यविक्री रेस्टॉरंट यांना मद्यविक्रीसाठी भरावे लागणारे शुल्क देखील निश्चित केले आहे. या निर्णयामुळे सरकारच्या अबकारी महसुलात वाढ अपेक्षित आहे.